तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापुरात नव्याने 21 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 12 पुरुष, 9 स्त्रियांचा समावेश आहे. तर एकाचा मृत्यू झाला असून कोरोनाने 30 वा बळी घेतला आहे. आज 3 तर आतापर्यंत 168 व्यक्ती बरे होऊन घरी गेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 458 वर पोहचली आहे. उर्वरित 258 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगळवारी दिली.
आज मृत झालेले 65 वर्षाचे पुरुष बुधवार पेठ परिसरात राहत होते.15 मे दरम्यान सिव्हीलमध्ये दाखल झाली होते. 18 मे रोजी उपचारा दरम्यान मृत पावले. त्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये कुमार स्वामी नगर – 1, शास्त्री नगर – 1,भैय्या चौक – 1, तेलंगी पाच्छा पेठ- 1, लोटस अपार्टमेंट गीता नगर- 1, पाच्छा पेठ – 1, लक्ष्मी चौक जुना विडी घरकुल – 1, कोनापुरे चाळ – 1, म्हेत्रे नगर -1 , सदिच्छा नगर, विजापूर रोड – 1, कुमठा नाका – 1, दत्त नगर -1, दाजी पेठ – 1, बुधवार पेठ -2 (2 स्त्री), संजय नगर – 1, रामवाडी- 1, संजय गांधी नगर रामवाडी- 1 , अरविंद धाम पोलिस वसाहत -1, पोस्ट पाचेगांव ता. सांगोला -1, तळे हिप्परगा ता. दक्षिण सोलापूर – 1 असे या भागातील नवीन रुग्ण आढळले आहेत.
आज एकूण 194 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 173 जणांचा रिपोर्ट निगेटिव आला तर 21 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत 456 कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे. यामध्ये 255 पुरुष तर 201 स्त्री आहेत. 258 रुग्ण सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 30 व्यक्ती मृत झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या 168 जणांना घरी सोडण्यात आले आहेत.
सोलापूर रेड झोन’मध्ये कायम
तिसऱ्या लॉकडाऊन मध्ये सोलापूर शहर रेड झोन मध्ये आले होते. त्यानंतरही सोलापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. त्यामुळे चौथ्या टप्प्यात ही जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोलापूरला रेड झोन’मध्ये कायम करण्यात आले आहे. चौथ्या लॉकडाऊन मध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता दिलेली नाही.
सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती
होम क्वांरटाईन-6543
एकूण अहवाल प्राप्त : 4612
आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 4156
आतापर्यंत अहवाल पॉझीटीव्ह : 456
उपचार सुरू- 258
बरे होऊन घरी गेले : 168
मृत- 30
Previous Articleवाढत्या चाकरमान्यांमुळे प्रशासन हतबल
Next Article म्हणे हा प्रत्यक्ष कोदंडपाणि









