सोलापुर / प्रतिनिधी
सोलापुरात नव्याने 14 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 7 पुरुष , 7 महिलांचा समावेश आहे. यामध्ये एक रुग्ण सारी रोगाचा आहे. आतापर्यंत 6 मृत आहेत. आतापर्यंत 19 जण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 128 वर पोहचली असून उर्वरित 103 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रविवारी दिली.
आज 213 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 199 अहवाल निगेटिव्ह आले तर 14 अहवाल पॉझिटीव्ह आले. यातील नई जिंदगी 1, शास्त्रीनगर 2, फॉरेस्ट चांदणी चौक 3, भारतरत्न इंदिरा नगर 2, बापुजी नगर 4, भद्रावती पेठ 1, लष्कर सदर बझार 1 असे एकूण 14 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आयसोलेशन वॉर्डात 2080, 1887 अहवाल प्राप्त झाले असून 1759 अहवाल निगेटिव्ह आले तर तर 193 अहवाल प्रलंबित असुन 128 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. केगाव येथील इन्स्टिट्यूशन कोरणटाईमधून आतापर्यंत 214 व्यक्ती बरे होऊन घरी गेले आहेत. आज 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे शहर जिल्ह्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती
होम क्वरटाईनमध्ये: 2253
आयसोलेशन वार्डात – 2080
-एकूण अहवाल प्राप्त : 1887
-आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 1759
-आतापर्यंतअहवाल पॉझीटीव्ह : 128
बरे होऊन घरी गेले- 19
-मृत : 06








