शंभर बाय दोनशे फूट गणरायाची प्रतिमा, अळीव रोपच्या साह्याने केली मार्किंगमध्ये पेरणी
जाकिरहुसेन पिरजादे / सोलापूर
लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेश भक्त, विशेषतः चिमुकले गणरायाचे आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र यंदा देशासह जगभरात कोरोना धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, कोरोनाच्या काळात लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सोलापुरातील बाळे येथील युवा चित्रकार प्रतीक तांदळे अर्ध्या एकर शेतीमध्ये आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून सुंदर पर्यावरणपूरक हरित अशी श्रीगणेशाची प्रतिमा अनोख्या पद्धतीने साकारली आहे. ही प्रतिमा शंभर बाय दोनशे फूट असून एवढ्या कमी वयात प्रतीक तांदळे याने आकर्षक व सुबक कलाकृती केल्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यात सर्वत्र या कलाकृतीचे कौतुक होत आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत लाडक्या बाप्पाचे आगमन काहीच दिवसावर येवून ठेपले आहे. चिमुकल्या पासून वृद्धापर्यंत तसेच सर्व गणेशभक्त लाडक्या बाप्पाला बाप्पाचे स्वागत करण्यासाठी आतुर असून सर्वत्र तय्यारी सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकार श्रीगणेशाच्या मूर्ती बनवून सोलापूर शहरासह परदेशातील लंडनमध्ये बाप्पाची मागणी वाढत आहे. तर दुसरिकडे सोलापुरातील युवा चित्रकार प्रतीक तांदळे शेतामध्ये अर्ध्या एकर परिसरात श्रीगणेशाची हरितपूरक प्रतिमा साकारली आहे. मागील 15 दिवसापासून या प्रतिमेच्या मार्किंगचे काम चालू होते. हरित गणरायाची प्रतिकृती साठी सुरुवातीस या शेतामध्ये गवत, गहू, अळीव रोपच्या साहयाने शंभर बाय दोनशे फूटमध्ये मार्किंगमध्ये पेरणी करण्यात आली. हे अळीव गवत पूर्ण उगविण्यासाठी साधारण 10 दिवस लागले आणि स्वातंत्र्यदिनी हरित गणरायाची प्रतिमा साकारली आहे.
मायाची प्रतिकृती साकारण्यासाठी अभिजित गायकवाड, राघव शिंदे , बॉबी तोडकारी, वैभव कोळी, अजय बामनकर, बालाजी अंबुरे, ओंकार राजुरे आदी परिश्रम घेतले.
सोलापुरातील युवा चित्रकार प्रतीक तांदळे यांनी विविध प्रकारची आकर्षक व सुबक चित्रे काढलेली आहेत. अगदी कमी वयात चित्रकलेत त्यांना यश मिळाले आहे. तांदळे यांनी यापूर्वीही चीनच्या हल्ल्यात शहीद कर्नल संतोषबाबू यांना चित्र कलेतून श्रद्धांजली वाहिली होती.









