आज 43 रुग्ण वाढले, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 992 वर
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापुरात नव्याने 43 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 25 पुरुष, 18 स्त्रियांचा समावेश आहे. तर एकाचा मृत्यू झाला असून 89 वा बळी कोरोनाने घेतला आहे. आज 49 तर आतापर्यंत 443 व्यक्ती बरे होऊन घरी गेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 992 वर पोहचली आहे. उर्वरित 460 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
आज एकाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामध्ये 1 स्त्रीचा समावेश असून निराळी वस्ती या परिसरातील रहिवासी आहेत. मृत्यूनंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
आज नव्याने आढळलेला रुग्णांपैकी कुमठा नाका 1, शिवाजी नगर बाळे 1, निराळी वस्ती 1, एमआयडीसी रोड 1, दमाणी नगर 1, होटगी रोड मजरेवाडी 2, मिलिंद नगर, बुधवार पेठ 1, बॉम्बे पार्क एक, वसंत नगर पोलिस लाईन 2, लक्ष्मी पेठ एक, उत्तर कसबा माळी गल्ली 3, दक्षिण कसबा एक, मौलाली चौक 1, दाजी पेठ 1, भवानी पेठ 3, सलगर वस्ती 2, समाधान नगर-1 अक्कलकोट रोड 1, मराठा वस्ती 1, बुधवार पेठ 6, गुरूनानक चौक तीन, करनिक नगर 1, रविवार पेठ 2, विडी घरकुल 1, फॉरेस्ट तिरेगाव 1, हिप्परगा तालुका उत्तर सोलापूर 1, बार्डी ता. पंढरपूर 1 आदी रुग्णांचा समावेश आहे.
आज एकूण 160 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 117 जणांचा रिपोर्ट निगेटिव आला तर 43 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत 992 कोरोनाबधितची संख्या झाली आहे. यामध्ये 560 पुरुष तर 432 स्त्री आहेत. 460 रुग्ण सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 89 व्यक्ती मृत झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या 443 जणांना घरी सोडण्यात आले आहेत.
सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती
होम क्वांरटाईन-5849
एकूण अहवाल प्राप्त : 7311
आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 6478
आतापर्यंत अहवाल पॉझीटीव्ह : 992
उपचार सुरू- 460
बरे होऊन घरी गेले : 443
मृत- 89









