कोरोनामुळे मजूर टंचाई , सोयाबीन उत्पादन खर्च वाढणार ?
प्रतिनिधी / व्हनाळी
गणेश विसर्जनानंतर गेला आठवडाभर पावसाने विश्रांती घेतल्याने कागलच्या पश्चीमेकडील व्हनाळी – साके ,बेलवळे ,केंबळी परिसरात शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी करून माळराणातील हंगामानुसार पेरणी केलेली सोयाबीनची मशिनद्वारे मळणी करण्यास शेतक-यांनी सुरूवात केली आहे. परिणामी गेले दोन दिवस सांयकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे सोयाबीन मळण्या पावसात सापडल्याने मोठे नुकसान होत असून यंदा सोयाबीनच्या मळणीवर वळीव पावसाचे सावट आल्याचे चित्र पहायला मिळत असून परिसरात कोरोनाचे पॅाझिटीव्ह रूग्ण सापडल्याने सोयाबीनच्या काढणीसाठी मजूरांची टंचाई जानवत आहे.
यंदा पावसाने नदीकाठी, डोंगराळ भागात उगवण झालेल्या सोयबीनला फुले, शेंगा यावर्षी चांगल्या प्रकारे आल्याने गतवर्षाच्या तुलनेत यंदा सोयाबीन पिक उत्पन्नात वाढ होणार आहे. तसेच मळणी केलेले सोयाबीन हे विक्री करण्यासाठी पुरेसे उन मिळत असल्याने यंदा दरही चांगला मिळण्याची अपेक्षा शेतक-यांना वाटत आहे. काही शेतकऱ्यांना एकरी ७ ते ८ तर काहींना ४ ते ५ पोती सोयाबीनचा उतारा येत आहे. असे असले तरी अजूनही अनेकांच्या शेतात कापलेले सोयाबीन पडून आहे अशातच मंगळवारी,बुधवारी सायंकाळी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भरच पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
सोयाबीन मळणीचा एका पोत्यास दोनशे पन्नास ते तिनशे रुपये इतका दर आहे. सोयाबीन कापनीसाठी परिसरात मजुरांची धावपळ सुरू आहे. पावसाच्या भीतीने कापणीला आलेले सोयाबीन मळणी करून ते शेतातून सुरक्षित घरी आणण्याकडे आजघडीला शेतकऱ्यांचा कल आहे. त्यासाठी मजूर मागेल ती रक्कम मजुरी म्हणून शेतकरी देत आहेत. सोबत मजुरांची जाण्या-येण्याची वाहनव्यवस्थाही शेतक-याला करावी लागत आहे. दररोज मजुरांची मजुरी बाढत आहे. यासाठी गरजवंत शेतकरी चढ्या मजुरीची बोली लावून मजूर कापणीसाठी आपल्या शेतात नेत आहेत. यामुळे सोयाबीन उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याचे चित्र परिसरात निर्माण झाले आहे. मात्र असे न केल्यास पाऊस हातचे आलेले पीक केव्हा मातीमोल करेल याचा काही नेम नसल्याची भीतीही शेतक-यांतून व्यक्त होत आहे.
शेतातून सोयाबीन थेट मार्केटमध्ये
ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकांची कापणी करीत मळणी केली, त्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या पदरी आलेले सोयाबीनचे उत्पादन थेट बाजारपेठेत विक्रीकरिता नेले. सध्या सोयाबीनला ३ हजार ते ३ हजार ३०० पर्यंत भाव मिळत आहे. लॅाकडावून काळात आर्थिक टंचाई जाणवत असले कारणाने अनेक शेतकरी सोयाबीनची साठवण न करता थेट विक्रीवरच भर देत असल्याचे दिसत आहे
पावसाने सोयबीन मळणी धोक्यात
कोल्हापूर जिल्ह्यात गत आठवड्यात दररोज कडक ऊन तर सायंकाळी जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मळणीवर आलेले सोयाबीन धोक्यात आले आहे. शेतात चिखल होत असल्याने सोयाबीनची मळणी रखडली आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास उत्पन्नात घट होवून नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









