बेळगाव : दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या मातोश्री सोमव्वा अंगडी यांचे आज सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 90 वर्षाच्या होत्या.
बेळगाव तालुक्यातील के.के. कोप गावच्या रहिवाशी असलेल्या सोमव्वा या गेले काही दिवस आजारी होत्या त्यांना दोन पुत्र व एक कन्या अशी मुले होती. सुरेश अंगडी यांच्यावर अतिशय प्रेम असलेल्या सोमव्वा यांना सुरेश अंगडी यांचे 23 सप्टेंबर रोजी निधन झाल्याने मोठा धक्का बसला होता. आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर के. .के कोप येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत . त्यांच्या निधनाने अनेकांनी दुःख व्यक्त केले सायंकाळी पाच वाजता केके कोप येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.









