47 जणांनी केली कोरोनावर मात
प्रतिनिधी /बेळगाव
सोमवारी कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. जिल्हय़ातील 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यापेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासांत 47 जणांनी कोरोनावर मात केली असून वेगवेगळय़ा इस्पितळांतून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
अथणी तालुक्मयातील एका 80 वषीय वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्हय़ातील एकूण रुग्णसंख्या 79 हजार 46 वर पोहोचली असून आतापर्यंत 77 हजार 757 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 402 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांत उपचार करण्यात येत आहेत.
मृतांचा सरकारी आकडा 887 वर पोहोचला आहे. प्रत्यक्षात दुसऱया लाटेत मोठय़ा प्रमाणात कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. अथणी, बैलहोंगल, गोकाक, खानापूर, रामदुर्ग, रायबाग, सौंदत्ती तालुक्मयात एकही रुग्ण आढळून आला नाही. बेळगाव तालुक्मयात 5, चिकोडी तालुक्मयात 4, हुक्केरी तालुक्मयात 2 रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्हय़ातील 3 हजार 613 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. अद्याप 1 हजार 716 जणांचा अहवाल यायचा आहे. आतापर्यंत जिल्हय़ातील 11 लाख 92 हजार 51 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून यापैकी 11 लाख 6 हजार 710 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.









