ऑनलाईन टीम / मुंबई :
पीएमसी घोटाळय़ातील आरोपी राकेश वाधवानशी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांचे आर्थिक संबंध असल्याने त्यांना पीएमसी घोटाळय़ातील आरोपांखाली अटक करावी, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केली होती. त्यानंतर आज पुन्हा राऊत यांनी सोमय्यांवर निशाणा साधला.
राऊत म्हणाले, 8 जेव्हीपीडी स्कीमचा सुजीत नवाब नावाचा एक प्लॉट आहे. हा 100 कोटी रुपयांचा प्लॉट किरीट सोमय्या आणि त्याचा बिल्डर मित्र अमित देसाई या दोघांनी मूळ मालकाला ईडीची धमकी देऊन मातीमोल भावाने अमित देसाई याच्या नावाने करून घेतला. त्यांनी या घोटाळय़ातून जवळपास 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमवले आहेत. त्यातील 15 कोटी रुपये एका ईडीच्या अधिकाऱ्याला दिले आहेत, असा थेट आरोप राऊत यांनी केला.
किरीट सोमय्या यांनी कोणत्या ईडी अधिकाऱ्याला हे 15 कोटी रुपये नेऊन दिले हे ईडीने स्पष्ट करावे. नाहीतर मी त्या अधिकाऱ्याचं नाव घेईन, असा इशाराही राऊत यांनी दिला.








