प्रतिनिधी / बेळगाव
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱया सोमनाथ मंदिराचे ट्रस्टी व मुख्य पुजारी कांतीभाई महाराज यांनी सोमवारी कपिलेश्वर मंदिराला भेट दिली. या निमित्त कपिलेश्वर मंदिर ट्रस्टच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कपिलेश्वर मंदिराचा परिसर पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी बेळगावच्या लोकांना सोमनाथ येथील मंदिराला भेट देण्याचे निमंत्रण दिले. यावेळी अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, उपाध्यक्ष सतीश निलजकर, राजू भातकांडे, अभिजित चव्हाण, राकेश कलघटगी, राहुल कुरणे, दौलत साळुंखे, अभय लगाडे यांच्यासह ट्रस्टी व सेवेकरी यावेळी उपस्थित होते.









