प्रतिनिधी / सातारा
विकासनगर, सातारा येथील रहिवासी असलेल्या सोमनाथ खुडे यांना शासनाच्या नावावर असलेली जमीन विक्री करुन त्याची 12 लाखाची फसवणूक करणाऱया तसेच त्यांचे बाँबे रेस्टारंट येथील दुकान पेटवून देणाऱयांवर ऍट्रॉसिटी तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा. खुडे यांची तक्रारच घेण्यास टाळाटाळ केली जात असून याबाबत न्याय न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिला आहे.
याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांना निवेदन दिले. यावेळी त्यांनी याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की श्रीरंग बंडू बोराटे, अशोक बजरंग बोराटे, रोहित अशोक बोराटे, शुभम अशोक बोराटे, मनोज बोराटे, बजरंग बंडू बोराटे, मनोज बोराटे, बापू बोराटे सर्व रा. चाहूर, खेड, सातारा यांनी सोमनाथ बळीराम खुडे रा. विकासनगर, सातारा यांना कार्यकारी अभियंता यांच्या नावावर असलेली जमीन विक्री केलीय.
हा जमिनीचा व्यवहार केवळ 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज करुन सोमनाथ खुडे यांच्याकडून 10 ते 12 लाख रुपये घेतलेले आहेत. ही फसवणूक लक्षात आल्यावर खुडे यांनी पैसे परत मागितले असता बोराटे कुटुंबियांनी वाद सुरु केला. या वादातूनच दि. 14 ऑक्टोबर रोजी खुडे यांचे बाँबे रेस्टारंट चौकातील भंगारचे दुकान पेटवून दिले. दुकानाची नासधूस करत गल्ल्यातील 18 हजार रुपये घेवून पळून गेले. याबाबत सोमनाथ खुडे सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता केवळ अदखल पात्र गुन्हा नोंद केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









