वृत्तसंस्था/ अबु धाबी
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम विजेती सोफिया केनिनने एकेरीची तिसरी फेरी गाठली. शुक्रवारी झालेल्या दुसऱया फेरीतील सामन्यात तिची प्रतिस्पर्धी कर्स्टेन फ्लिपकिन्स जखमी झाल्याने तिने स्पर्धेतून माघार घेतली. अन्य एका सामन्यात जेबूरने तिसऱया फेरीत स्थान मिळविले.
केनिन आणि फ्लिपकिन्स यांच्यातील दुसऱया फेरीतील सामन्यात फ्लिपकिन्सने पहिला सेट 7-5 असा जिंकून केनिनवर आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱया सेटमध्ये फ्लिपकिन्सने 5-4 अशी बढत केनिनवर मिळविली होती. दुसऱया सेटमध्ये खेळताना फ्लिपकिन्सच्या घोटय़ाला दुखापत झाल्याने तिने स्पर्धेतून माघार घेतली. फ्लिपकिन्सने स्पर्धा सोडल्यामुळे केनिनला तिसऱया फेरीत प्रवेश मिळवता आला. दुसऱया एका सामन्यात पंधराव्या मानांकित जेबूरने बोंडारेन्कोचा 5-7, 6-3, 6-2 असा पराभव करत तिसरी फेरी गाठली. गेल्या वषी जेबूरने ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.