ऑनलाईन टीम / मुंबई :
वायदे बाजारात सोन्याच्या दरात 1650 रुपयांनी घट झाली आहे. 47 हजार 250 रुपयांवरून सोने प्रति तोळा 45 हजार 600 रुपयांवर पोहचले आहे. चांदीच्या दरातही आज 1 हजार रुपयांची घसरण पहायला मिळाली. चांदी 43 हजार 800 रुपयांवरून प्रति किलो 42 हजार 800 रुपयांवर आली आहे.
कोरोनामुळे सराफा बाजार बंद असले तरीही वायदे बाजार सुरू आहेत. लॉकडाऊनच्या काळात सुरुवातीला लोकांचा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वाढता कल होता. त्यामुळे सोन्याच्या दरात कमालीची वाढ पहायला मिळाली. मात्र, मागील आठवड्यापासून गुंतवणूकदार वायदे बाजारातील सोने विकत आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरात घसरण पहायला मिळत आहे.









