ऑनलाईन टीम / मुंबई :
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक गोल्डन चान्स आहे. 30 दिवसांनी गुरुवारी सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. अनेक दिवसांनी सोन्याची किंमत 48 हजारच्या खाली आली आहे.
गुरुवारी (आज) सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 786 रुपयांनी स्वस्त झाला आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 47,611 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर चांदीच्या दरात देखील घट झाली असून आज चांदीचा दर 70,079 प्रति किलो इतका आहे.
- 18 कॅरेट सोन्याची किंमत ..
सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाल्यास 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 47,611 रुपये तर 23 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 47,420 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर 22 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर आज 43,612 प्रति 10 ग्रॅम इतका आहे. याशिवाय 18 कॅरेट सोन्याची किंमत कमी होऊन 35,708 प्रति 10 ग्रॅम इतका आहे. यासोबतच चांदीच्या किंमतीत देखील घट झालेली दिसून आली. आज चांदीचा दर 70,079 वर पोहोचला आहे.
- MCX वर सोन्याचे दर
मल्टी कमाॅडिटी एक्सचेंजवर सोन्याचा किंमतीत 2 टक्क्यांनी घट झाली. म्हणजेच 951 रुपये घट झाली. लेटेस्ट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम साठी 47,555 रुपये इतका आहे.









