वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय बाजारात मागील 40 दिवसांमध्ये सोन्याच्या किमती 5.6 टक्क्यांनी वधारुन तीन महिन्यांच्या उंचीवर पोहोचल्या आहेत. दरम्यान भारतातील सोन्याच्या किंमतीतही 0.9 टक्के वाढ झाली आहे.
रुपयामध्ये आलेल्या मजबूतीसह देशातील बाजारात सोन्याच्या किमतीवर आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीचा प्रभाव झाला नव्हता. एमसीएक्सनुसार सोन्याची किंमत 10 ग्रॅममागे 49,292 रुपये होती. महागाईच्या जमान्यात आजही लोकांचा कल सोने खरेदीकडे दिसतो. येणाऱया लग्नहंगामासाठी लोक आधीच सोने खरेदी करून ठेवण्यावर भर देत असतात.
मागणीचा कल वाढताच
डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने देशातील बाजारातील सोन्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीत होते. परंतु आता सणासुदीसोबत लग्नसोहळा सुरु होत असल्याने ग्राहकांची प्रत्यक्ष सोने मागणीत मोठी वाढ राहणार असल्याचे केडिया ऍडव्हायजरचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले आहे.









