जपानमध्ये उनागी नामक माशाची सध्या जोरदार चर्चा आहे. हा ईल जातीचा मासा जपानमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची याची क्षमता असल्याने सध्याच्या काळात त्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. गेल्या वर्षभरात या माशाला प्रचंड मागणी निर्माण झाल्याने त्याच्या किमतीने गगनाला गवसणी घातली आहे. एक किलो बेबी ईल माशाची किंमत 35 हजार डॉलर म्हणजेच जवळपास सोन्याच्या किमतीइतकी झाली आहे.
हा मासा अधिक प्रमाणात सापडत नाही. तसेच त्याचे उत्पादन कृत्रिम वातावरणात अधिक प्रमाणात करता येत नाही. त्यामुळे नेहमीच याची किंमत इतर माशांपेक्षा बरीच जास्त असते. सध्या त्याला मागणी अधिक वाढल्याने किमतीत भरच पडली आहे. दरवषी केवळ 40 ते 50 टन उनागी ईल मासे विकले जातात.
हा मासा वेळेवर संवर्धित केला नाही तर त्याची प्रजाती नामशेष होईल, अशी शक्मयता संशोधकांनी व्यक्त केली आहे. 1980 पासून या माशाचा आहारात वापर अधिक प्रमाणात होऊ लागला. त्यानंतर दहाच वर्षात त्याचे नैसर्गिक उत्पादन 75 टक्क्मयांनी कमी झाले. याला मिळणारी जास्त किंमत पाहून छोटे ईल मासे पकडण्याकडे कल वाढला. त्यामुळे पुनरुत्पादन रोखले गेले. आता जपान सरकारने या माशाला वाचविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच्या अतिरिक्त शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. तलावांमध्ये त्याचे उत्पादन वाढविण्यासाठी विशेष संशोधन करण्यात येत आहे. पुढील दहा वर्षात या प्रजातीची संख्या वीसपट वाढविण्याचा प्रयत्न जपानमधील खासगी संस्थाही करीत आहेत.









