स्थानिकांनी युवकास दिले पोलिसांच्या ताब्यात
वार्ताहर / दोडामार्ग:
दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने आलेल्या बिहारी युवकाकडून गंडा घालण्याचा प्रयत्न जागृत महिलेमुळे फसला. संबंधित युवकाचे नाव इरसाद अली (रा. मनोहरपूर, बागलपुर बिहार) असे असून त्याला दोडामार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उशिरापर्यंत त्याच्यावर कारवाही करण्याचे काम सुरू होते.
दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने दागिन्यातील सोने काढून घेऊन ते लंपास करणारी टोळी सध्या जिह्यात कार्यरत आहे. त्यापैकी एक बिहारी युवक आवाडे येथे गावोगावी येऊन काम करत दागिने पॉलिश करण्याचे काम करत असताना आवाडे येथे आला. यावेळी संमोहनाचा उपयोग करून तेथील एका युवतीला त्याने सोने पॉलिश करण्याच्या बहाण्याने गंडा घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या युवतीची आई बाहेर आली असता तिला हा प्रकार लक्षात आला. तिने जागृकता दाखवत त्या भामटय़ाला शेजाऱयांच्या मदतीने पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कार्यवाही करण्याचे काम सुरू होते.









