ऑनलाईन टीम / मुंबई :
सराफा बाजारात आज गुरुवारी सोन्यामध्ये मोठी घसरण झाली आहे. मुंबईत सोन्याचा भाव 370 रुपयांनी कमी झाला. तर मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर बुधवारी सोन्याचा भाव 47 हजार 355 रुपयांवर गेला होता. दिवसभरात सोन्याचा भाव 47 हजार 437 रुपयांपर्यंत वाढला होता. मात्र बाजार बंद होताना नफावसुली झाली आणि सोन्याचा भाव 139 रुपयांनी घसरला. बाजार बंद होताना सोने 47 हजार 141 रुपयांवर स्थिरावले आहे.
चांदीला देखील नफावसुलीचा फटका बसला. एमसीएक्सवर एक किलो चांदीचा भाव 62 हजार 735 रुपयांपर्यंत खाली आला. त्यात 794 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. आज गुरुवारी मोहरमनिमित्त कमॉडिटी बाजार बंद होता. आज गुरुवारी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 46 हजार 130 रुपये इतका खाली आला आहे. त्यात बुधवारच्या तुलनेत 370 रुपयांची घसरण झाली. 24 कॅरेटचा भाव 47 हजार 130 रुपये इतका झाला आहे.
दिल्लीत आज दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 46 हजार 250 रुपये इतका झाला आहे. त्यात कालच्या तुलनेत 210 रुपयांची घसरण झाली. 24 कॅरेटसाठी सोन्याचा भाव 50 हजार 450 रुपये झाला आहे. तर कोलकात्यात आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 46 हजार 600 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा भाव 49हजार 300 रुपये आहे.









