बेकायदा प्रवेश-चोरीचा गुन्हा, अज्ञात आरोपींवर सीआयडीची फिर्याद
प्रतिनिधी / बेळगाव
बहुचर्चित सोने चोरी प्रकरणी बुधवारी रात्री उशिरा यमकनमर्डी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला. पोलीस स्थानक आवारात बेकायदा प्रवेश करून 4 किलो 900
ग्रॅम सोने चोरणाऱया अज्ञातांविरुद्ध सीआयडीच्या अधिकाऱयांनी एफआयआर दाखल केल्यामुळे लवकरच या प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार आहे.
गेल्या आठवडय़ात सीआयडीचे डिटेक्टीव्ह पोलीस अधीक्षक राघवेंद्र हेगडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेळगावात येऊन या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली होती. बुधवारी रात्री सीआयडीचे डिटेक्टीव्ह पोलीस उपनिरीक्षक आनंद यांनी यमकनमर्डी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून भा.दं.वि. 380 व 447 कलमान्वये एफआयआर दाखल केला आहे.
तिलक पुजारी यांची तक्रार
9 जानेवारी रोजी हत्तरगी टोलनाक्मयाजवळ केए 19 एमएच 9451 क्रमांकाची कार अडवून पोलिसांनी तपासणी केली होती. या कारमध्ये 4 किलो 900
ग्रॅम सोन्याचे दागिने होते. आलप्पी पेरमार-मंगळूर येथील तिलक पुजारी यांनी बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रार अर्जावरुन एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
तिलक पुजारी हे लक्ष्मी ज्वेलर्स सराफी पेढी चालवितात. त्यांच्या दुकानांत जुने दागिने देऊन नवीन खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी दिलेले 4 किलो 900 ग्रॅम सोने दागिने बनविण्यासाठी कोल्हापूरला नेण्यात येत होते. दरोडेखोरांच्या भीतीने कारमध्ये एअरबॅगच्या ठिकाणी हे दागिने लपवून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी कार तपासली त्यावेळी दागिने सापडले नाहीत.
16 एप्रिल रोजी न्यायालयाच्या आदेशावरुन कार सोडण्यात आली.
त्यावेळी एअरबॅगच्या ठिकाणी दागिने नव्हते. कारच्या पाठीमागील काचही बदलण्यात आल्याची तक्रार तिलक पुजारी यांनी केली होती. या तक्रारीवरुन हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले होते. प्राथमिक तपासाअंती बुधवारी रात्री अज्ञातांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले.
चोरी प्रकरणी फिर्याद दाखल झाल्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आता गती मिळणार आहे. सीआयडी तपासात कोणत्या अधिकाऱयांची नावे बाहेर पडणार?, खासगी दलालांना अटक होणार का? चोरीचे सोने जप्त होणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात असून चौकशीअंतीच या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. या प्रकरणात सहभागी असलेल्या वरि÷ पोलीस अधिकाऱयांना वाचविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.









