कोरोना महामारीसह लॉकडाऊनचा मागणीवर प्रभाव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारी आणि लॉकडाऊन या कारणामुळे बाजारातील सोने मागणीत मोठय़ा प्रमाणात घसरण नोंदवण्यात आली आहे. यामध्ये मागील चार महिन्यांपासून (एप्रिल-जुलै) या कालावधीत सोने आयात मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 81.22 टक्क्मयांनी घटल्याची नोंद करण्यात आली आहे.
सदर घसरणीपाठोपाठ मागील चार महिन्यात भारताने जवळपास 18,590 कोटी रुपये मूल्याचे सोने आयात केले असल्याचे वाणिज्य मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या माहितीमधून स्पष्ट केले आहे. एक वर्षाच्या समान कालावधीत भारताने 91,440 कोटी रुपये मूल्याची सोने आयात केली होती. देशातील चलन मोठय़ा प्रमाणात सोने आयात केल्याने विदेशात जात असते, त्यामुळे सरकारकडून सोने आयात कमी करण्याचे संकेत व्यक्त होत आहेत. कारण जास्त आयातीने देशातील चालू खात्यातील तोटा मोठय़ा प्रमाणात निर्माण होत असल्याचे नमूद केले आहे. यात चांदी आयातही चालू वर्षातील पहिल्या चार महिन्यात 56.5 टक्क्मयांनी घटून 5,185 कोटींवर आली आहे.
व्यापारी तोटा कमी होण्यास मदत
सोने आणि चांदी आयात घटल्याने देशातील व्यापारी तोटा कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे संकेत आहेत. यामध्ये एप्रिल ते जुलै 2020 मध्ये देशाचा क्यापारी तोटा 13.95 अब्ज डॉलरवर राहिला आहे. हाच आकडा मागील वर्षातील समान कालावधीत 59.4 अब्ज डॉलरवर राहिला होता. कारण निर्यातीच्या तुलनेत आयात मूल्य अधिकचे असल्यानेच क्यापारी तोटा होत आहे.









