वृत्तसंस्था/ मिलान
येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील कॅगलेरी आंतरराष्ट्रीय पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत इटलीचा सोनेगो आणि सर्बियाचा डिजेरी यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल.
शनिवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या उपांत्य सामन्यात इटलीच्या सोनेगोने अमेरिकेच्या टेलर फ्रिझचा 6-4, 5-7, 6-1 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. हा उपांत्य सामना तीन तास चालला होता. दुसऱया उपांत्य सामन्यात सर्बियाच्या विद्यमान विजेत्या डिजेरीने जॉर्जियाच्या बॅसिलासेव्हेलीचा 6-2, 6-0 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. सर्बियाच्या डिजेरीने 2019 साली रिओतील तर गेल्यावर्षी कॅगलेरी स्पर्धेतील विजेतेपद मिळविले आहे. एटीपी टूरवर आतापर्यंत डिजेरीने तसेच इटलीच्या सोनेगोने दोन स्पर्धा जिंकल्या आहेत.









