प्रतिनिधी / मिरज
तालुक्यातील सोनी येथे व्यंकोबा मंदिराजवळील शेतात शेतकऱ्याचा संशयास्पद मृतदेह सापडला. मिलिंद वाघमारे उर्फ बब्बर (वय ५५) असे मृताचे नाव आहे. शेतात एक पांढरा इजार घातलेला माणूस पडला असल्याचे काही ग्रामस्थांना दिसले. त्यांनी पाहणी केली असता सदर व्यक्ती मृत होता. त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली जात आहे. वाघमारे यांच्या अंगावर जखमांच्या खुणा होत्या. मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसून मिरज ग्रामीण पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.








