महाराष्ट्रात नाथसंप्रदाय हा बऱयाच मोठय़ा प्रमाणात पसरलेला आहे, पण त्यांच्यावर मालिका झाली नाही. सोनी मराठी वाहिनी छोटय़ा पडद्यावर इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांवर मालिका घेऊन येते आहे. गाथा नवनाथांची ही मालिका 21 जनूपासून संध्याकाळी 6ः30 वा. भेटीला येणार आहे. कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्य कल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला. आतापर्यंत गोष्टींया स्वरूपात वाचलेल्या व ऐकलेल्या कथा या मालिकेतून प्रेक्षकांना दृश्य स्वरूपात पाहायला मिळणार आहेत. मच्छींन्द्रनाथांच्या जन्माची कथा सर्वश्रुत असली, तरी त्यांच्या बालपणाबद्दलची माहिती फार लोकांना नाही, त्यांचं बालपण, संगोपन अशा गोष्टी मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचणार आहे. ही पौराणिक मालिका असनू त्या काळाला साजेसे नेपथ्यासह अशा प्रकारची पौराणिक मालिका करणं, हे आव्हानात्मक असणार आहे. काही प्रसंग दाखवण्यासाठी साठी व्हीएफएक्स या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. मराठीत वीएफएक्सचा वापर फार कमी प्रमाणात केला जातो. त्यामुळे या मालिकेतील वीएफएक्स हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे.
Previous Articleएडीक्युची बायजूमध्ये गुंतवणूक
Next Article ऑटो कंपन्यांचे काम पूर्ववत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









