नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपचारासाठी शनिवारी रात्री उशिराने अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी देखील विदेशात गेले आहेत. पक्षाचे महासचिव आणि मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबाबतची माहिती ट्विट करत दिली. नियमित चेकअपसाठी हा दौरा असून त्यांच्यासोबत राहुल गांधी देखील गेले आहेत याआधी सोनिया गांधी 30 ऑगस्टला दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या. नियमित तपासणीसाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. परदेशात जाण्याआधी सोनिया गांधींनी शुक्रवारी पक्षसंघटनेत मोठे बदल केले होते.









