नवी दिल्ली
देशात वाहनांचे पार्टस् तयार करणारी सर्वात मोठी कंपनी सोना बीएलडब्लू प्रीसिजन फॉर्गिंग्न म्हणजे सोना कॉमस्टार लवकरच आयपीओ आणणार आहे. कंपनी यायोगे 6000 कोटी रुपये जमा करण्याच्या तयारीत आहे. बाजारातील नियामक सेबीने सोना कॉमस्टारच्या आयपीओला मंजुरी दिली आहे. सदरचा आयपीओ हा कोणत्याही वाहन कंपोनंट बनविणाऱया भारतीय कंपनीच्या तुलनेत सर्वात मोठा पब्लिक इश्यू राहणार आहे. 300 कोटी रुपयांचे प्रेश आणि 5,700 कोटी रुपयाचे शेअर कंपनीचे प्रमोटर्स आणि उपलब्ध गुंतवणूक ऑफर फॉर सेलच्या आधारे उपलब्ध करणार आहे.
जूनपर्यंत आयपीओ शक्य
चालू फेब्रुवारीत आयपीओसाठी अर्ज दाखल केला होता. यामुळे अंदाजानुसार जनूच्या प्रारंभी आयपीओ सादर करणार असल्याचे संकेत आहेत. सोना कॉमस्टारने आयपीओसाठी क्रेडिट सुइस, नोमुरा, जेपी मॉर्गन, जेएम फायनान्शियल आणि कोटक महिंद्रा कॅपिटलला आपला लीड मॅनेजर नियुक्त केला आहे.









