तेजस्विनी पंडित आणि सोनाली खरे या दोघींनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्या दोघींनीही मी लिपस्टिकचे समर्थन करत नाही, असे म्हणत भर व्हिडीओत स्वतःच्या ओठावरील लिपस्टिक पुसली. या व्हिडीओला कॅप्शन देताना ‘माझा लिपस्टिकला विरोध आहे’. बॅन लिपस्टिक! असे म्हटले आहे. त्यानंतर त्या दोघींनीही बॅन लिपस्टिक असा हॅशटॅगही वापरला आहे. मात्र त्यांचा हा व्हिडीओ नेमका कशासाठी आहे याचा उलगडा अजून झालेला नाही. त्यांचा हा व्हिडीओ प्रमोशनचाच एक भाग असल्याचे म्हटले जात असले, तरी त्या दोघी कोणत्या चित्रपटात किंवा नाटकात झळकणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सध्या प्रेक्षक औत्सुक्याने यामागे नेमके काय कारण आहे हे शोधताना दिसत आहेत. तेजस्विनी आणि सोनाली यांनी आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांत दमदार काम केलं आहे. त्या दोघीही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात.
संकलन – अनुराधा कदम









