46 टक्के वाढीसह निर्यातीत तेजी
मुंबई
सोनालिका ट्रक्टर्सची विक्री सप्टेंबर महिन्यात वर्षाच्या पातळीवर 46 टक्क्यांनी वधारुन 17,704 वर पोहोचली आहे. कंपनीने शुक्रवारी या संदर्भात माहिती दिली आहे. देशातील बाजारात कंपनीच्या ट्रक्टर्सची विक्री ही 51.4 टक्क्यांनी वाढून 16,000 इतकी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षातील समान महिन्यात हा आकडा 10,571 इतका राहिला होता. समीक्षकांच्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात निर्यात 9.8 टक्क्मयांनी वधारुन 1,704 वर राहिली आहे. जी गेल्या वर्षात समान महिन्यात 1,552 इतकी राहिली आहे.
होशियारपूरच्या कंपनीची सप्टेंबरमध्ये कृषी उपकरणांची विक्रीही 6,400 इतकी राहिली आहे. जी गेल्या वर्षातील समान महिन्याच्या तुलनेत 135 टक्क्मयांनी अधिक आहे. चालू वित्त वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एप्रिल ते सप्टेंबरच्या दरम्यान 63,561 टॅक्टर्सची विक्री झाल्याची नोंद आहे.









