पावसाळय़ासाठी उपाययोजना : आमदार आलेक्स लॉरेन्स यांनी दिलेली माहिती, नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱयांसह यार्डाची पाहणी
प्रतिनिधी / मडगाव
कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी मडगाव पालिकेच्या नगराध्यक्षा पूजा नाईक, मुख्याधिकारी अजित पंचवाडकर व अन्य अधिकाऱयांसह सोनसडा यार्डाची शनिवारी पाहणी केली. पावसाळय़ात कचऱयात पाणी शिरून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येऊ नये तसेच भूगर्भातील पाणीसाठा प्रदूषित होऊ नये म्हणून कचऱयावर शनिवारपासूनच ताडपत्रीचे आवरण टाकण्यास प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती लॉरेन्स यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सदर कचऱयाला मे महिन्यात आग लागण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. असे प्रकार घडल्यानंतर आपल्या मतदारसंघांतील रहिवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत असतो. त्यामुळे तसेच मान्सूनपूर्व काय खबरदारी घेण्यात आली आहे याची पाहणी करण्यासाठी आपण येथे आल्याचे त्यांनी सांगितले. वरचेवर सोनसडा यार्डाला आग लागण्याचे प्रकार घडत असतात. भर उन्हाळय़ात मे महिन्यात असे प्रकार घडल्याने याबाबत खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे काही दिवसांपूर्वी आमदार लॉरेन्स यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व घनकचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांना पत्र लिहून नजरेस आणून दिले होते.
शनिवारी मुख्याधिकारी पंचवाडकर, नगराध्यक्षा नाईक, पालिका अभियंता गावकर, कनि÷ अभियंता अजय देसाई यांच्यासह सोनसडा यार्डाची पाहणी केल्यानंतर आमदार लॉरेन्स यांनी काही प्रश्न उपस्थित केले व अधिकाऱयांनी दिलेल्या उत्तरावर त्यांनी समाधान व्यक्त केले. सोनसडय़ावरील पडून असलेल्या कचऱयाच्या ढिगाऱयांवर सध्या बायोरेमिडिएशन प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत 20 ते 25 टक्के कचऱयाचेच बायोरेमिडिएशन झाले आहे. लॉकडाऊन व अन्य काही कारणांमुळे आवश्यक गती राखणे कंत्राटदाराला शक्मय झालेले नाही, असे ते म्हणाले. मात्र कचऱयावर आवरण टाकणे अत्यंत गरजेचे असल्याचे लॉरेन्स यांनी सांगितले.
घनकचरा महामंडळ प्लास्टिक आवरण टाकणार : नगराध्यक्षा
आमदार लॉरेन्स यांनी पालिकेशी सोनसडय़ाच्या पाहणीसाठी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार ही पाहणी करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा नाईक यांनी दिली. घनकचरा व्यवस्थापन महामंडळांकडून कचऱयावर प्लास्टिकचे आवरण टाकले जाईल तसेच सर्व बाजूंनी पत्रे लावण्यात येणार आहेत. कचऱयात पाणी शिरू नये वा कचरा रस्त्यावर वाहून येऊ नये यासाठी ही उपाययोजना करण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. शनिवारपासून काम सुरू होणार असे म्हटले असले, तरी प्लास्टिक आवरण टाकण्यास प्रारंभ न झाल्याचे नजरेस आणून दिले असता सायंकाळपासून हे काम सुरू होण्याची शक्मयता त्यांनी व्यक्त केली.









