झाडे झुडपे हटवून केला गाळ उपसा
वार्ताहर/ संगमेश्वर
गेले वीस वर्षे प्रतिक्षेत असलेला व शेतकऱयांनी वारंवार मागणी केलेल्या सोनगिरीतील नदीतील गाळ उपसा केल्याने सोनगिरीने अखेर मोकळा श्वास घेतला आहे. नदीतील झाडे झुडपे हटविण्यात आल्याने यावर्षी पुरापासून होणारी समस्या कमी होणार आहे.
कोळंबे पाठोपाठ बावनदीच्या मुखातील सोनगिरी गावातील गाळ उपसा करण्यात यावी अशी मागणी पं.स.सदस्या वेदांती पाटणे यांनी आमदार व उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. पाटबंधारे विभागाशी संपर्क करीत मागणी व पाठपुरावा केल्याने कोळंबे पाठोपाठ सोनगिरी गावाजवळच्या मुखातील गाळ उपसा केल्याने या नदीने मोकळा श्वास घेतला आहे. झाडे झुडपे हटविण्यात आल्याने दरवर्षी होणारी पुराची समस्या दूर होणार आहे.









