प्रतिनिधी/सांगली
हेडक्वार्टर रिक्रुटींग झोन पुणे यांनी कळविल्यानुसार सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याकरिता सन 2020-21 चे सैन्यभरतीचे वेळापत्रक कोरोनाच्या संकटामुळे बदलण्यात आले आहे. नविन वेळापत्रकानुसार सदर भरती प्रक्रिया 16 मार्च 2021 ते 04 एप्रिल 2021 या कालावधीत राबविली जाईल. तरी सर्व संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले (निवृत्त) यांनी केले आहे.
Previous ArticleE20 पेट्रोलच्या वापरास केंद्राची परवानगी
Next Article दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची ब्रिटनच्या संसदेत चर्चा








