प्रतिनिधी / सांगली
येथील सांगली शिक्षण संस्थेच्या, श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राध्यापक व सांगली सायकल स्नेहीचे सभासद डॉ. नवनाथ इंदलकर यांनी भारतीय सैन्यदलाने आयोजित केलेल्या व्हर्चुअल सायक्लोथॉन स्पर्धेत भारतात चौथे व महाराष्ट्रातून पहिले मानांकन प्राप्त केले. 75 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त सैन्यदलाने या उपक्रमाचे आयोजन केले होते.
या उपक्रमात 75 कि.मी. सायकल चालविणे अपेक्षित होते. डॉ. नवनाथ इंदलकर यांनी सांगली ते तळबीड आणि परत सांगली अशी 200 कि.मी. सायकल चालवून हे मानांकन प्राप्त केले. त्यांचे सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन खाडीलकर व सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. बी. पी. मरजे तसेच सांगली सायकल स्नेही मंडळामार्फत अभिनंदन करण्यात आले.
Previous Articleउड्डाणपुलामुळे स्थानिकांसह व्यापाऱ्यांना दिलासा
Next Article कोरोनाविरूद्धच्या लढ्यात घेणार विद्यार्थ्यांची मदत!








