प्रतिनिधी / कुरुंदवाड
सैनिक टाकळी ता शिरोळ येथील नागरिकांनी गायरान जमीनीत केलेले अतिक्रमण महसूल विभागाने पोलिस बंदोबस्तात काढून टाकले. गेल्या आठवड्यात सैनिक टाकळी येथील सुमारे चारशेहून अधिक जणांनी गावातील सुमारे साठ एकरातील गायरान जमीनीत रात्रीतून अतिक्रमण केले होते. अनेका़नी सिमेंटचे खांब पुरुन स्व:च हद्दी करुन घेतल्या होत्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मोठ्या संख्येने जमाव येवून अतिक्रमण केल्याने ग्रामपंचायतीचीही चांगलीच पंचाईत झाली होती.
दरम्यान काही लोक महापूराचे कारण सांगून आमची घरदार पाण्याखाली जातात आम्हाला सुरक्षित म्हणून ही जागा पाहिजे अशी मागणी करीत होते. तर महापूरातही ज्यांची घर सुरक्षित होती. अशा असंख्य लोकांनीही अतिक्रमण करुन जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला. राजापूर राजापूरवाडी खिद्रापूर येथील पूरग्रस्तांसाठी येथे जागा देण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यापार्श्वभूमीवर आधीच जागा अतिक्रमण करुन पदरात पाडून घेण्याच्या उद्देशाने लोकांनी याठिकाणी मोठ्या संख्येने अतिक्रमण केले. दरम्यान अचानक झालेल्या अतिक्रमणामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यापूढे पेच निर्माण झाला होता. दरम्यान तहसिलदारांनी याप्रकरणी अतिक्रमण तात्काळ काढा अन्यथा ग्रामपंचायत बरखास्त करु अशी नोटीस बजावली होती. मात्र अखिल परिस्थिती पाहून महसूल विभागानेच कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
नायब तहसिलदार पी.जी.पाटील मंडल अधिकारी विनायक माने पोलिस निरीक्षक चंद्रकांत निरावडे पोलीस उपनिरीक्षक विकास आडसूळ तलाठीआभिजीत कोळी यांच्यासह महसुल विभागाच्या कर्मचार्यांनी जेसीबीच्यअ सहाय्याने सिमेंटचे पोल काढून टाकले. कांही अतिक्रमण धारकांनी पूरग्रस्त असून ही जागा द्या अशी मागणी केली मात्र अधिकार्यांनी त्यांना समजावले.त्यामुळे कोणाचाही विरोध गडबड गोंधळ न होता अतिक्रमणे काढण्यात आली .सरपंच सौ हर्षदा पाटील उपसरपंच सुदर्शन भोसले ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
टाकळीच्या पूरग्रस्तांनाच जागा द्या.
सैनिक टाकळीच्या गायरान जागेत राजापूर राजापूरवाडी खिद्रापूर येथील पूरग्रस्त कुटुंबांचे स्थलांतर व पुनर्वसन करण्यात येणार असल्याची चर्चा असून आमच्या गावातील गायरान जागेवर आमच्या गावातील पूरग्रस्तांचा पहिला हक्क आहे त्यांनाच ही जागा द्या अशी मागणी ग्रामस्थांची आहे.महसूल अधिकार्याकडेही त्यांनी अशी मागणी केली. दरम्यान गावातील पूरग्रस्तांना येथील जागा मिळावी यासाठी ग्रामपंचायत जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करणार असल्याचे सरपंच हर्षदा पाटील यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








