प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुक्यातील सैतवडे बोरसई मोहल्ला येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून लाखोंचे नुकसान झाल़े अब्दुल अजिज खलपे (54, ऱा सैतवडे) यांच्या मालकीचे हे घर हेत़े शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक या घराला आग लागल़ी आगीचे स्वरूप एवढे होते की, तासातच हे घर जळून खाक झाल़े सुदैवाने या आगीमध्ये जीवितहानी झाली नाह़ी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैतवडे बोरसई मोहल्ला येथे अब्दुल खलपे यांच्या घराला सायंकाळी 6 च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागल़ी संपूर्ण घरामध्ये लाकडाचे फर्निचर असल्याने काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल़े यामुळे आजूबाजूच्या घरांनाही धोका निर्माण झाला होत़ा ही आग आटोक्यात आणण्यासाठी जयगड येथील जिंदल व चौगुले कंपनी याच्या अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आल़े यावेळी ग्रामस्थांनीही पिंपामधून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केल़ा दरम्यान आगीचे स्वरूप मोठे होत गेल्याने संपूर्ण घर जळून खाक झाल़े तब्बल 9 अग्निशमन दलाच्या बंबाच्या पाण्याचा मारा करूनही आग आटोक्यात आणण्यात अपयश येत होत़े दरम्यान तब्बल 8 तासांच्या प्रयत्नांतर ही आग आटोक्यात आणण्यात ग्रामस्थ व अग्निशमन दलाला यश आल़े
ग्रामस्थांमुळे वाचले वृध्देचे प्राण
या घरामध्ये असलेल्या वृद्ध महिलेला ग्रामस्थांनी तातडीने घराबाहेर सुखरूप आणल्याने तिचे प्राण वाचल़े दरम्यान संपूर्ण घर या आगीमध्ये खाक झाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाल़े या घटनेची नोंद जयगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आह़े पुढील तपास करण्यात येत आह़े









