बेंगळूर/प्रतिनिधी
गेले कित्येक दिवस बंद असलेली रेल्वे सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. रेल्वे बंद असल्याने प्रवाशांचे हाल झाले हेत. दरम्यान दक्षिण रेल्वेने सोमवारी जाहीर केले की संपूर्ण आरक्षित डबल डेकर विशेष ट्रेन बुधवारी २१ ऑक्टोबर पासून डॉ. एमजीआर चेन्नई सेंट्रल आणि केएसआर बेंगळूर स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेने सेवा सुरू करेल.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सहा महिन्याहून अधिक काळ बंद असणारी रेल्वे सेवा पुन्हा सुरू होणार असल्यामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे. रेल्वे सुरु केल्याने दररोज शेकडो प्रवाश्यांना मदत होणार.
दक्षिण रेल्वेने दिलेल्या अधिसूचनेनुसार ट्रेनमध्ये आठ एसी-चेअर कारचे डबे असतील आणि सकाळी ०७.२५ वाजता चेन्नई येथून सुटेल तर दुपारी ०१.१० वाजता बेंगळूरला पोहोचेल. परतीच्या दिशेने ही ट्रेन दररोज बेंगळूरहून दुपारी ०२.३० वाजता सुटेल आणि चेन्नईला रात्री ०८.३० वाजता पोहोचेल. अधिसूचनेनुसार वरील विशेष आरक्षणासाठी मंगळवारी २० ऑक्टोबर सकाळी ०८ वाजल्यापासून खुली असणार आहे.









