11 वर्षामधील सर्वोच्च स्थिती
नवी दिल्ली ः बाजारांमधील मागणी संबंधीची स्थिती मजबूत होत गेल्याच्या कारणामुळे मार्च महिन्यात सेवा क्षेत्राची कामगिरी मजबूत राहिल्याचे दिसून आले. सदरचा महिन्यातील कामगिरी ही मागील 11 वर्षांमधील सर्वोच्च ठरली आहे. अशी माहिती एका सर्वेक्षणामधून देण्यात आली आहे.
एस ऍण्ड पी ग्लोबल इंडिया सेवा पीएमआय व्यवसायातील गतीचा निर्देशांक मार्चमध्ये 53.6 वर राहिला आहे. फेब्रुवारीत हा 51.8 वर राहिला तर डिसेंबरनंतर विस्तार वेगाने होत गेल्याचे दिसून आले आहे. हा सलग आठवा महिना आहे, की यामध्ये सेवा क्षेत्राने उत्पादनांमध्ये विस्तार नोंदवल्याची माहिती आहे. पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्सने 50 च्या वरती वृद्धीचा तेजी निश्चित केली आहे. तर 50 च्या खाली घसरणीचा कल दिला आहे.
युक्रेन युद्धाने पुरवठा साखळी अगोदर पासून येणाऱया समस्यांमध्ये अडकली आहे. यामध्ये भारतीय सेवा अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणात्मक स्थिती राहिली आहे. यासह सेवा क्षेत्राने नवा विक्रम नोंदवत मागील 11 वर्षांचा विक्रम मोडीत काढल्याचे दिसून आले. असे एस ऍण्ड पीचे ग्लोबल सहाय्यक अर्थतज्ञ पॉलिएना डि लीमा यांनी स्पष्ट केले आहे.









