ऑनलाईन टीम / नवी मुंबई
कोरोनाने देशासह राज्यात दीड वर्षापासून थैमान घातले असले आहे. या परिस्थितीला आरोग्य प्रशासन हाताळत आहे. पण अंतरिम जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आली. त्यांनी आपल्या या अऩुभवाबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. याला निमित्त ठरले ते सेवानिवृत्त विभागीय आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या कोरोना परिस्थितीवरील पुस्तकाच्या प्रकाशनाचे. या वेळी दिपक म्हैसेकर आणि आपण एकाच वयाचे असलो तरी म्हैसेकर सेवानिवृत्त होणार होते आणि माझ्यावर मात्र राज्याची जबाबदारी आल्याचे म्हटले.
या कार्यक्रमात त्यांनी आपण ही या युद्धजन्य स्थितीला हाताळताना प्रारंभी अनभिज्ञ होतो. अशी प्रांजळ कबुली ही मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमा दरम्यान दिली. राज्य चालवण्याचा अनुभव माझ्याकडे नव्हता. अशावेळी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी माझ्यावर पडली होती. ही युद्धजन्य स्थिती कशी हाताळावी याबद्दल मला काही सुचत नव्हते. काय निर्णय घ्यावा, काय सुरु करावं, काय बंद करावं हे समजत नव्हते. आणि आज ही फारसं समजत नाही. पण याचवेळी केंद्रच्या सूचनेनुसार काम सुरु केले. आणि लॉकडाऊनसारखा पर्याय माझ्यासमोर आला. यावेळी सहकाऱ्यांच्या मदतीने मी निर्णय घेतल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिपक म्हैसेकर यांच्या कामाची दखल घेत त्यांच्या ही कामाचं कौतुक केले. म्हैसेकर सेवानिवृत्त होणार होते. पण म्हैसेकर यांनी काम थांबवले नाही. त्यांनी कोरोनाचा पाठलाग करत कोरोनामुक्तीचा मार्ग दाखवला. अशा शब्दात दिपक म्हैसेकर यांच्या बद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी गौरवोद्गार काढले.








