सातारा / प्रतिनिधी
सातार्यातील कास पठार परिसरात सेल्फीच्या नादात दरीत कोसळलेल्या एका युवकास बाहेर काढण्यात आले आहे. पुष्कर जागळे (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा )असे या युवकाचे नाव आहे.
हा युवक दुचाकीवरून शुक्रवारी सकाळी कास पठाराकडे फिरायला गेला होता. तो गणेश खिंड परिसरात दुचाकी उभा करून सेल्फी पॉईटवर सेल्फी घेत होता. त्यावेळी तोल जाऊन तो दरीत पडला. याची माहिती तालुका पोलिसांना मिळताच पोलिसांनी व शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स यांना अथक प्रयत्नाअंती त्याला बाहेर काढण्यात यश आले. तसेच नगरसेवक धनंजय जांभळे यांनीही सहकार्य केले. सायंकाळी उशिरा जखमी अवस्थेत बाहेर काढलेल्या त्या युवकास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की यादोगोपाळ पेठेतील पुष्कर जांगळे हा युवक आज सकाळी त्याच्या दुचाकीवरून कास पठार भागात फिरणाऱ्यासाठी गेला होता. गणेशखिंड येथे गेल्यानंतर त्याला सेल्फी काढण्याचा मोह झाला.त्याने रस्त्यावर दुचाकी लावली चालत जाऊन सेल्फी पॉईंटवर उभा राहून सेल्फी काढत असता पाय घसरून पडला ही बाब काही नागरिकांनी पाहिली असता त्यांनी तालुका पोलिसना याची माहिती दिली.पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सज्जन हंकारे यांनी पोलीस कर्मचारी तेथे पाठवून दिले तसेच शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स यांना पाचारण करण्यात आले. ट्रेकर्सचे विक्रम पवार (पापा), चंद्रसेन पवार, देवा गुरव, सौरभ जगताप, आदित्य पवार, मुकुंद पवार, ऋषी रंकाळे, संज्योग पडवळ, अभिजित शेलार यांच्यासह नगरसेवक धनंजय जांभळे यांनी पोलिसांना मदत केली. सायंकाळी उशिरा त्या युवकास बाहेर काढण्यात यश आले.त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.