झेन मलिक अन् गीगी हदीद यांचे नाते संपुष्टात
झेन मलिक अन् गीगी हदीद या जोडप्याला पसंत करणाऱया चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. हॉलिवूडमधील हे पॉवर कपल दोन वर्षांचे नातेसंबंध आता संपुष्टात आणत आहे. झेन आणि गीगी स्वतःची मुलगी काईचे को-पॅरेंटिंग (सह-पालकत्व) सुरूच ठेवणार आहेत.

या जोडप्याने आता स्वतःच्या वेगवेगळय़ा वाटा निवडल्या आहेत. चांगल्या पालकाप्रमाणे ते काई या स्वतःच्या मुलीची काळजी घेणार आहेत. मुलीच्या उत्तम पालनपोषणावर लक्ष पेंदीत करण्यास प्राथमिकता असून या अवघड काळात आमच्या खासगीत्वाची काळजी घेतली जावे असे गीगीकडून म्हटले गेले आहे. झेनने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप गीगीच्या आईने अलिकडेच केला होता. योलांदा हदीद यांनी झेनच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचा विचार चालविला होता. त्यानंतर झेनने सोशल मीडियावर पोस्ट करत घरातील घटना जगजाहीर केल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती.









