नवी दिल्ली
सेल अर्थात स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमधील 10 टक्के हिस्सा विक्री करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर शेअर बाजारात कंपनीच्या समभागांचे भाव गुरूवारी 10 टक्के इतके खाली आले होते. ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून सरकार ही हिस्सेदारी विकणार असल्याचे सांगण्यात येते. या हिस्सेदारी विक्रीतून सरकारला 2 हजार 600 कोटी रुपये मिळतील. 5 जानेवारी 2021 रोजी कंपनीच्या समभागाचा भाव शेअर बाजारात 80.35 अंकांवर दोन वर्षाच्या उच्चांकी स्तरावर पोहचला होता.









