नवी दिल्ली
पोलाद उत्पादक कंपनी सेलने सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात दमदार कामगिरी नोंदवल्याने कंपनीचे समभाग 13 टक्के इतके वाढल्याचे दिसले. कंपनीने सप्टेंबरच्या तिमाहीत 4 हजार 304 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. कंपनीने या नफ्यानंतर प्रति इक्विटी समभागामागे 4 रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. कंपनीचे समभाग सोमवारी 13 टक्के वाढत 130 रुपयांवर पोहचले होते.









