रिलायन्स व्यवहारासंदर्भात संकेत : ऍमेझॉनसोबत वाद
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फ्यूचर गुप यांचा व्यवहार हा सेबीच्या मंजुरीनंतर पूर्ण होणार असल्याचे संकेत आहेत. फ्यूचर ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ किशोर बियानी यांनी दिलेल्या माहितीनुसार ऍमेझॉनसोबत असणारा वादविवाद यावर सुनावणी आणि रिलायन्ससोबतचा व्यवहार या दोन्ही सोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बियानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत आपला रिटेल व्यवसाय 24,713 कोटी रुपयांना विकण्यासाठी व्यवहार केला आहे.
ऍमेझॉनने 2019 मध्ये फ्यूचर कूपन्सची 49 टक्के हिस्सेदारी 2000 कोटी रुपयांमध्ये घेतली होती. कोणत्याही दुसऱया कंपनीसोबत व्यवहार करण्याच्या अगोदर फ्यूचरला ऍमेझॉनला माहिती द्यावी लागणार होती.









