मुंबई
देशामध्ये लवकरच नवीन स्टॉक एक्सचेंज सुरु होण्याचे संकेत आहेत. मार्केट रेग्युलेटर सेबीने यासाठी नवीन नियमावलीचा ड्राफ्ट तयार केला आहे. 5 फेब्रुवारीपर्यंत यावर काही सुचना असतील तर त्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत. सुधारणात्मकतेसाठी सुचना मागिवल्यानंतर अंतिम नियमावली तयार करण्यात येणार आहे. नवीन एक्सचेंज सुरु करण्यात आल्यानंतर मोठय़ा प्रमाणात स्पर्धा वाढत जाणार आहे. याचा सर्वाधिक लाभ हा गुंतवणूकदारांना कमी शुल्काच्या रुपात मिळण्याची शक्यता आहे. यावेळी सेबीने म्हटले आहे,की केवळ 7 जानेवारी रोजी राष्ट्रीय शेअर बाजारावर 73 हजार कोटी रुपयांच्या समभागामध्ये व्यापार झाला आहे. परंतु यामध्ये टेक्निकली समस्या येत आहेत.









