सेप ब्लॅटर/ जिनेव्हा / वृत्तसंस्था
फिफाने सेप ब्लॅटर यांच्यावर दुसऱयांदा बंदी जाहीर केली आहे. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे फिफाने जाहीर केले. 85 वर्षीय ब्लॅटर यांच्यावरील पहिली बंदी पूर्ण होण्यासाठी अद्याप 7 महिन्यांचा कालावधी बाकी असताना हा तडकाफडकी निर्णय घेतला गेला. ब्लॅटर यांची प्रकृती अलीकडे अत्यवस्थ राहिली असून डिसेंबरमध्ये हृदयाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते एक आठवडा कोमात होते. ब्लॅटर व त्यांचे सहकारी, माजी सचिव जेरोम व्हॅल्के यांच्यावर विश्वचषक स्पर्धा आयोजित करताना लक्षावधी डॉलर्सचा बोनस लाटला असल्याचा आरोप आहे. ब्लॅटर यांच्यावरील 6 वर्षे 10 महिन्यांचा पहिल्या बंदीचा कालावधी यंदा ऑक्टोबरमध्ये संपणार आहे.









