जागतिक-देशातील बाजारात सकारात्मक कल – आयसीआयसीआय बँक तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी भारतीय भांडवली बाजार 397 अंकांनी मजबूत स्थितीत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये प्रामुख्याने जागतिक आणि देशातील बाजारात सकारात्मक कल राहिल्याने आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग मजबूत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर सेन्सेक्स 397.04 अंकांसह 0.76 टक्क्यांच्या तेजीने निर्देशांक 52,769.73 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 119.75 अंकांसोबत निर्देशांक 15,812.35 वर स्थिरावला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये मंगळवारी आयसीआयसीआय बँकेचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी तेजीत राहिले असून यासह एचडीएफसी, ऍक्सिस बँक, सन फार्मा, एनटीपीसी व महिंद्रा ऍण्ड महिंद्रा यांचे समभाग लाभात राहिले आहेत. याबरोबरच सकारात्मक आर्थिक स्थितीमुळे आशियातील बाजारात उत्साहाचे वातावरण राहिल्याने देशातील बाजारात तेजीची उसळी राहिली असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे.
जूनमध्ये ग्राहक मूल्य निर्देशांकाच्या आधारे रिझर्व्ह बँकेच्या संतोषजनक पातळीवर वरती राहिला आहे. परंतु यामध्ये 6.30 टक्क्यांच्या घसरणीसह 6.26 टक्क्यांवर राहिला आहे. याच्या व्यतिरिक्त मे महिन्यात औद्योगिक उत्पादन वर्षाच्या आधारे अनुकूल प्रभावाने 29.3 टक्क्यांनी वाढला आहे.
जागतिक पातळीवर चीनच्या आर्थिक मजबूतीच्या संकेतामुळे आशियातील बाजारात तेजीचा माहोल राहिला. चीनचा शांघाय, कम्पोझिट, हाँगकाँगचा हँगसेंग व जपानचा निक्की हे लाभात राहिले आहेत.








