जागतिक पातळीवर नकारात्मक स्थिती – इंडसइंड सर्वाधिक नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी सेन्सेक्स 355 अंकांनी घसरुन बंद झाला आहे. यामध्ये जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरणाचा परिणाम हा भारतीय बाजारावर झाला असल्याचे पहावयास मिळाले आहे. यात दिवसभरात एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेल यांचे समभागही प्रभावीत झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर सेन्सेक्स 354.89 अंकांनी घसरुन निर्देशांक 52,198.51 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 120.30 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 15,632.10 बंद झाले.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीत इंडसइंडस बँकेचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी प्रभावीत झाले आहे. यासह टाटा स्टील, एनटीपीसी, भारती एअरटेल, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि एचडीएफसी बँके यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये एशियन पेन्ट्सचे समभाग सर्वाधिक 6 टक्क्यांनी अधिक मजबूत झाले आहेत. अल्ट्राटेक सिमेंट, बजाज ऑटो, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि नेस्ले इंडिया यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर नकारात्मक वातावरणाच्या प्रभावात आर्थिक समभागात विक्रीचा दबाव राहिल्याने देशातील शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. यामध्ये दैनंदिन वापरातील साहित्य बनविणाऱया कंपन्या (एफएमसीजी) आणि आयटी वगळता आर्थिक, धातू आणि रियल्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत.
आशियातील अन्य बाजारांमध्ये शांघाय, हाँगकाँग, सियोल आणि टोकीओ हे न्gढकसानीत राहिले आहेत. तर युपरोपातील प्रमुख शेअर बाजारांमध्ये काहीसा तेजीचा कल राहिला आहे.
तिमाही अहवालांचा परिणाम
मागील आठवडय़ापासून विविध कंपन्यांचे तिमाही अहवालाचे आकडे सादर केले जात आहेत. या आकडेवारीचा काहीसा प्रभाव भारतीय भांडवली बाजारावर राहिला असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. यामध्ये मध्यम आणि लहान कंपन्यांचे सभागात विक्री राहिल्याचे दिसून आले आहे.








