एचडएफीसी बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो आणि टायटनची मजबूत कामगिरी
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय शेअर बाजारातील घसरणीला पूर्ण विराम मिळत चालू आठवडय़ातील गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी नवा विक्रम नोंदवत बंद झाले आहेत. जागतिक पातळीवर जास्तीत जास्त बाजारांमध्ये नकारात्मक कल निर्माण झाला होता. परंतु या स्थितीमध्येही एचडीएफसी बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो आणि टायटन यांचे समभाग तेजीत राहिल्याने गेले दोन दिवस घसरणीचा प्रवास करणाऱया भारतीय बाजाराने मजबूत स्थिती प्राप्त केली आहे.
गुरुवारच्या सत्रात दिवसभराच्या कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स 382.95 अंकांनी वधारुन निर्देशांक 52,232.43 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 114.15 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 15,690.35 वर बंद झाला.
दिग्गज कंपन्यांच्या समभागांमध्ये सर्वाधिक 7 टक्क्यांच्या तेजीत टायटनचे समभाग राहिले आहेत. यासोबत ओएनजीसी, लार्सन ऍण्ड टुब्रो, कोटक बँक, ऍक्सिस बँक, बजाज फायनान्स आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग वधारले आहेत. तर दुसऱया बाजूला इंडसइंड बँक, पॉवरग्रिड कॉर्प, बजाज ऑटो, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि डॉ.रेड्डीज लॅब आदीचे समभाग घसरले आहेत.
बाजारात उत्साह का परतला
देशातील बाजारामध्ये उत्साह कायम राहिला आणि मानक निर्देशांकांनी विक्रमी टप्पा प्राप्त केला आहे. तसेच बाजारात मजबूत हिस्सेदारी कायम ठेवण्यासाठी आर्थिक सेवा देणाऱया कंपन्यांच्या समभागातील तेजीने बाजाराला बळ मिळाले. यामध्ये धातूसह दैनंदिन वापरातील साहित्याची निर्मिती करणाऱया कंपन्यांचे समभाग लाभात राहिल्याचा फायदाही झाला आहे.
तज्ञांच्या माहितीनुसार आयटी, औषध आणि वाहन कंपन्यांचे समभाग काहीसे दबावात राहिले. परंतु मध्यम आणि लहान कंपन्यांच्या समभागांनी मात्र मजबूत कामगिरी केली. उत्पन्नातील सुधारणात्मक संकेतामुळे गुंतवणूकदारांमध्ये आकर्षण निर्माण होत असल्याचाही लाभ शेअर बाजाराला झाला आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- टायटन……… 1691
- ओएनजीसी….. 122
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1510
- ऍक्सिस बँक….. 750
- कोटक महिंद्रा. 1814
- बजाज फायनान्स 5901
- एचडीएफसी बँक 1520
- एशियन पेन्ट्स 2934
- एचडीएफसी.. 2582
- नेस्ले……….. 17781
- इन्फोसिस….. 1389
- एनटीपीसी…… 111
- स्टेट बँक………. 439
- भारती एअरटेल 532
- टीसीएस……. 3141
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2209
- मारुती सुझुकी 7204
- आयसीआयसीआय 650
- हिंदुस्थान युनि 2361
- अल्ट्राटेक सिमेंट 6600
- आयटीसी…….. 209
- ज्युबिलंट फूड. 3185
- अपोलो हॉस्पिटल 3426
- एलआयसी हाऊसिंग 499
- आयशर मोर्ट्स 2768
- पेट्रोनेट एलएनजी 246
- सिमेन्स……… 2136
- कमिन्स……….. 808
- अदानी पोर्ट….. 825
समभाग घसरलेल्या कंपन्या
- इंडसइंड बँक.. 1005
- पॉवरग्रिड कॉर्प. 225
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 802
- बजाज ऑटो… 4273
- डॉ.रेड्डीज लॅब. 5286
- एचसीएल टेक.. 939
- सन फार्मा……. 675
- टेक महिंद्रा…. 1013
- बजाज फिनसर्व्ह 11816
- मदरसन सुमी… 250
- ल्यूपिन……… 1232
- एबीबी इंडिया 1688









