निफ्टी 11,400 च्या वरती : इंडसइंडची मजबूत कामगिरी
वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील आणि जागतिक पातळीवर सकारात्मक संकेतामुळे वित्तीय कंपन्यांच्या समभागातील मजबूत लिलावामुळे सेन्सेक्सने गुरुवारी शेवटच्या दिवशी 629 अंकांची उसळी प्राप्त केली आहे. प्रमुख कामगिरीच्या जोरावर सेन्सेक्स 629.12 अंकांनी मजबूत होत 38,697.05 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 169.40 अंकांनी वधारुन 11,416.95 वर बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिवसभरातील मजबूत कामगिरीनंतर इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक 12 टक्क्मयांनी वधारले आहेत. तसेच सोबत बजाज फायनान्स, ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह आणि कोटक बँक यांच्या समभागांनीही सकारात्मक कामगिरीची नोंद केली आहे. मात्र दुसरीकडे आयटीसी, एनटीपीसी, टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ओएनजीसीचे समभाग घसरले आहेत.
जगभरातील सकारात्मक संकेताच्या बळावर व पीएमआय पुनर्निमाण आकडेवारीच्या देशातील सकारात्मक वाढीसोबत बाजारातील व्यवहारांचा प्रारंभ झाला होता आणि याचाच लाभ शेअर बाजाराला गुरुवारी झाल्याचे पहावयास मिळाले आहे. देशातील उत्पादन क्षेत्रात सलग दुसऱया महिन्यात होणाऱया सुधारणात्मक कामगिरीचा लाभ गुंतवणूकदारांनी घेतल्याची नोंद गुरुवारी केल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
बँकांसह वित्तीय कंपन्यांची चमक
दिग्गज कंपन्यांमध्ये दिवसभरात बँका आणि वित्तीय कंपन्यांच्या समभागाच्या व्यापक स्वरुपात झालेल्या लिलावाचा प्रभाव भारतीय बाजारावर राहिला होता. लॉकडाऊनच्या दरम्यान बँक कर्ज परतावा करण्यातील गतीमधील मंदीने आणि अधिकच्या व्याजसंदर्भात होणाऱया चर्चेसंदर्भातील बातम्यांचाही परिणाम होत असल्याची नोंद केली आहे. तसेच सरकारच्या अनलॉक 5 च्या नवीन नियमावलीचाही लाभ येत्या काळात देशातील शेअर बाजाराला होणार असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.