निफ्टीही घसरणीसह बंद : बँकांचे समभाग नुकसानीत
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय शेअर बाजारातील घसरणीचे सत्र कायम राहिले असून यामध्ये पुन्हा गुरुवारच्या सत्रातही तब्बल 433 अंकांची पडझड होत बाजार घसरणीसह बंद झाला आहे. जागतिक पातळीवरील वाढलेल्या दबावासह विदेशी फंड काढून घेण्याकडे गुंतवणूकदारांचा कल राहिल्याने भारतीय बाजार घसरणीसह बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीत आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि भारतीय स्टेट बँक यांचा कल नकारात्मक राहिला असल्याने भारतीय बाजारातील दबाव वाढत गेल्याची माहिती आहे. दिवसभरातील कामगिरीनंतर दिवसअखेर सेन्सेक्स 433.13 अंकांसह 59,919.69 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 143.60 अंकासोबत 17,837.60 वर बंद झाला आहे.
निफ्टीतील धातू क्षेत्र वगळता इतर क्षेत्रांचे निर्देशांक नुकसानीत होते. ऑटो निर्देशांक 2 टक्के इतका सर्वाधिक घसरलेला दिसला. ऑटो, बँकिंग आणि रियल्टी समभागांमध्ये खरेदीचा कल दिसून आला. एसबीआयचे समभाग 2 टक्के घसरले होते. सेन्सेक्समध्ये 6 आणि निफ्टीतील 8 समभाग तेजीत होते. सेन्सेक्समध्ये टायटनचेस समभाग खरेदी अधिक झाले. भारतीय बाजार, आशियातील बाजार यांच्यात मिळताजुळता कल राहिला होता. अमेरिकेतील नकारात्मक वातावरणामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी आपली रक्कम काढून घेतली. याचा परिणाम हा देशातील बाजारातील कामगिरीवर राहिला असल्याने बाजारात मोठी घसरण राहिली. बाजारात शेवटी निफ्टीतील टायटन, हिंडाल्को व जेएसडब्ल्यू स्टील यांचे समभाग तेजीसह बंद झाले.
जागतिक पातळीवरील स्थिती
जगभरातील बाजारांमध्ये आशियातील अन्य बाजारात शांघाय, हाँगकाँग आणि टोकिओमधील निर्देशांक तेजीसह बंद झाले होते. तर सोल बाजार नुकसानीत राहिला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.63 टक्क्यांसोबत 83.1 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- टायटन…….. 2528
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 924
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2554
- टीसीएस…… 3488
- इंडसइंड बँक. 1033
- टाटा स्टील… 1298
- आयजीएल…… 500
- पेट्रोनेट एलएनजी 237
- हिंडाल्को…….. 454
- जेएसडब्लू स्टील 666
- टोरंटो फार्मा. 2837
- अपोलो हॉस्टिपल 4571
- एसीसी…….. 2556
- वेदान्ता………. 324
- कोल इंडिया…. 167
समभाग घसरलेल्या कंपन्या
- स्टेट बँक……… 509
- बजाज फिनसर्व्ह 17872
- टेक महिंद्रा… 1529
- सन फार्मा…… 794
- बजाज फायनान्स 7448
- एशियन पेन्ट्स 3064
- ऍक्सिस बँक…. 738
- एचडीएफसी 2908
- कोटक महिंद्रा 2050
- पॉवरग्रिड कॉर्प 182
- आयसीआयसीआय 772
- हिंदुस्थान युनि 2375
- भारती एअरटेल 728
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1931
- एचसीएल टेक 1161
- मारुती सुझुकी 7453
- अल्ट्राटेक सिमेंट 8050
- एनटीपीसी….. 136
- एचडीएफसी बँक 1548
- आयटीसी……. 229
- बजाज ऑटो.. 3751
- नेस्ले………. 18883
- इन्फोसिस…. 1732
- डॉ.रेड्डीज लॅब 4819
- गोदरेज………. 952
- एसबीआय लाईफ 1157








