भूल भुलैया 2 चे चित्रिकरण, बायो बबलमध्ये राहते अभिनेत्री
कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू सध्या स्वतःचा आगामी चित्रपट भूल भुलैया 2 च्या चित्रिकरणात व्यस्त आहेत. याचदरम्यान कार्तिकने चित्रपटाच्या सेटवरून एक छायाचित्र प्रसारित केले असून यात तब्बू एका विशेष प्रोटेक्टरच्या मागे दिसून येत आहे. हा तब्बूचा स्पेशल झेडप्लस कोरोना बायो बबल असल्याचे कार्तिकने म्हटले आहे.
तब्बू सेटवर स्वतःचा पोर्टेबल झेड प्लस बायो बबल आणत असते. कार्तिकसोबत छायाचित्रात अनीस बज्मी आणि कियाराही दिसून येते. तब्बूचे हे स्पेशल कोरोना कवच काचेने तयार करण्यात आले आहे. कार्तिक आणि कियारा अलिकडेच मनाली येथे चित्रिकरण करून परतले आहेत. काही दिवसांपूर्वी कार्तिकने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. हा चित्रपट 19 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.









