बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी बुधवारी, माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांच्यासंबंधित कथित लैंगिक प्रकरणाची एसआयटी चौकशी करत आहे. या प्रकरणाची एसआयटी निश्चित गुन्हेगारी प्रक्रियेनुसार सर्व बाजूंनी तपास करत आहे आणि कोणत्याही राजकीय दबावाला बाली न पडता सत्य बाहेर आणेल, असे म्हंटले आहे.
दरम्यान या तपासावर टीका केल्याबद्दल मंत्री यांनी विरोधी कॉंग्रेसला फटकारले आणि म्हटले की विशेष तपास पथक (एसआयटी) कायद्यानुसार काम करीत असल्याने तपासात कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही.









