प्रतिनिधी/ वडूज
सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकयांनी आपली प्रगती साधावी त्यासाठी स्पर्धेच्या युगामध्ये शेतकयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतामध्ये विविध प्रयोग करून शेती विकसित करावी त्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खताचा वापर केल्यास शेतीचा पोत सुधारुन उत्पादन चांगले निर्माण होईल त्यासाठी शेतकयांनी पारंपरिक शेती न करता सेंद्रिय शेतीच्या मागे लागून आपला विकास साधण्याचे आवाहन स्फूर्ती फाऊंडेशन व ग्रो मोर ऍग्रो कंपनी कराड येथील डॉ. नितीन मोरे यांनी केले.
खटाव तालुक्यातील तडवळे ,पुसेगाव, नागनाथवाडी याठिकाणी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अनेक शेतकयांनी या कार्यक्रमास हजेरी लावली व शेतकयांनी आपली मनोगते व्यक्त केली त्यातून शेतीचा विकास कशा पद्धतीने करता येईल याचे सविस्तर मार्गदर्शन केल्याने अनेक शेतकयांनी ग्रो मोर कंपनी च्या माध्यमातून शेतीचा विकास साधू. यावेळी योगिता काळे ,दिपाली शिंदे,, पूनम चव्हाण, छगन खाडे, अशोक पवार, केशव खाडे, बाळासो खाडे गुरुजी , शशिकांत साबळे ,पवन हांगे ,प्रविण खापे,शिवाजी फडतरे,गणपत फडतरे,पुंडलिक ननावरे,भिमराव तोराकर,सुनिल घाडगे ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जे. के. काळे यांनी केले तर आभार श्री बाळासाहेब खाडे यांनी केले









